

- June 29, 2022
आपले संस्थेचे अध्यक्ष
श्री. रविंद्र जोशी सन २०१९-२० या वर्षात AIFMP चे अध्यक्ष असताना त्यानी सभेमधे वेळोवळी आपल्या संस्थे सारखी AIFMP भवन साठीही अशीच जागा असावी हे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी व त्यांच्या टीम ने AIFMP भवन साठी जागा मिळविण्यासाठी खुप प्रयत्न केले. आज जा जागेचा भुमिपुजन समारंभ हरियाना चे मुख्यमंत्री मा. मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते संपन्न झाला.
श्री. रवींद्र जोशी आणी त्यांची टीम यांनी या कामात जी मेहनत घेतली याचे फळ भविष्यात भारतातील सर्व मुद्रकांनी मिळेल. या निमित्ताने आज आपली संस्था भारतभर पोहचली आहे. आपले अध्यक्ष श्री. रविंद्र जोशी यांचे AIFMP मध्ये खुप मोठे योगदान आहे. आज खरे अर्थाने त्यांचे स्वप्न पुर्ण झाले. त्यांनी आपली संस्था दि पुना प्रेस ओनर्स असोसिएशनला संपुर्ण भारतात मानाचे स्थान मिळुन दिले बद्दल त्यांना मानाचा मुजरा 🙏
रविंद्र सरांना २०२३ मधील पामेक्स ची अध्यक्ष पदाची जवाबदारी आहे त्यासाठी त्यांना सर्वांचे नक्कीच सहकार्य राहील तसेच पुढील वाटचालीस त्यांना मनापासुन खुप खुप शुभेच्छा !