- March 23, 2023
२०१९ सालातील “कॉविड १९” ह्या साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावानंतर सलग दोन वर्षांच्या कालावधीनंतर पूर्णपणे बंधनमुक्त वातावरणात होणाऱ्या व आंतराष्ट्रीय किर्तीमान प्राप्त केलेल्या, मुद्रण ( प्रिंटिंग ) विषयाशी निगडित PAMEX हे प्रदर्शन मार्च २३ च्या अखेरीला म्हणजे २०२२-२३ ह्या आर्थिक वर्षाच्या शेवटी साकारले. ह्या प्रदर्शनाची संकल्पना THEAM होती. Conversions in Printing म्हणजे “मुद्रणातील रुपांतरणे “
ह्याच संकल्पनेच्या धर्तीवर पामेक्स २०२३ प्रदर्शन साकारले गेले. पामेक्स प्रदर्शनाच्या संकल्पनेचा योग्य प्रकारे प्रचार होण्याच्या दृष्टीने व जास्तीत जास्त मुद्रक बांधवानी प्रदर्शनाला भेट द्यावी ह्या उद्देशाने “PAMEX ROAD SHOW” करण्याचे पामेक्स आयोजकांनी निश्चित केले.
पारंपरिक मुद्रण व्यवसायाला जास्त उत्पादन खर्च, कच्च्या मालाचे सतत वाढत राहणारे दर, कुशल व एकनिष्ठ कामगारांचा तुटवडा अशा इतर अनेक समस्यांनी घेरल्या गेलेल्या मुद्रण व्यवसायात काही छोटे बदल करून, मुद्रणातील नविन व्यवसाय शाखा सुरू करण्यासाठी ह्या प्रदर्शनातून खूप मोठी मदत व/किंवा दिशा दाखवली जाऊ शकते.
ह्या प्रदर्शनाच्या संकल्पनेचा हा विचार लक्षात घेऊन जास्तीतजास्त मुद्रकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी व उपलब्ध संधीचा फायदा घ्यावा. ज्या मुद्रकांना आपला व्यवसाय वाढवायचा असेल किंवा व्यवसाय सीमा वाढवायचा असतील, तर पामेक्स २०२३ प्रदर्शनाच्या रोड शोच्या माध्यमातून जे हवे त्याची निश्चत आगाऊ (advance) मध्ये माहिती घेऊ शकेल अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला गेला होता.
पामेक्स २०२३ चे भारतातील विविध शहरात एकूण ७ रोड शो करण्यात आले. त्या पैकी पहिला रोड-शो शुक्रवार २३ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यातील कर्वेरोड वरील “हॉटेल प्रेसिडेंट” येथे घेण्यात आला. ह्या कार्येकमा अंतर्गत प्रिंटिंग क्षेत्राच्या विविध शाखेतील ५ अग्रेसर कंपनीच्या प्रतिनिधींकडून उपस्थित मुद्रकांसोबत मुद्रण व्यवसायांसंबंधी विषयांवर परिसंवादात्मक चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. ह्या नंतर सर्व उपस्थित अभ्यंगतांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. ह्या कार्येक्रमाला अंदाजे २५० ते ३०० मुद्रक व्यवसायिक उपस्थित होते. ह्या कार्येक्रमाला पुण्याशिवाय कोल्हापूर, सोलापूर, सांगली, इचलकरंजी,अ. नगर, ठाणे, डोंबिवली ह्या शहरातील मुद्रकांनी हजेरी लावली होती. हा रोड शो खूप उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध पध्दतीने पार पडला.













