- May 19, 2023
शुक्रवार दि. १९ मे २०२३ रोजी संस्थेचा १०४ वा वर्धापनदिन आनंदात साजरा करण्यात आला. ह्या निमित्ताने संस्थेची सदाशिव पेठ येथील इमारतीला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. संस्थेचे कार्यालयात फुलांच्या माळा लावून कार्यालय सुशोभित करण्यात आले होते.
संस्थेच्या ‘मुद्रक भवन’ सदाशिव पेठ, ह्या वास्तूत सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रवींद्र जोशी ह्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. ह्या वेळी संस्थेचे इतर मान्यवर, संस्था चिटणीस श्री. राहुल मारुलकर, उपाध्यक्ष श्री. तीर्थराज जोशी व संस्थेचे इतर मान्यवर संचालक डॉ. गणेश दात्ये, श्री विनय कळसकर, श्री संजय सावंत, श्री विक्रम गोगावले व श्री राजेंद्र सुपे व संस्थेतील कर्मचारी वर्ग उपस्थित होते. ह्या नंतर चहा- पानाचा कार्येक्रम करण्यात आला.
सायंकाळच्या सत्रात संस्थेच्या सभासदांनी व हितचिंतकांनी संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन आपल्या शुभेच्छा व सदिच्छा नोंदवल्या. भेट देणाऱ्या प्रत्येकाला अल्पोपहार देण्यात आला.
अशा रितीने संस्थेचा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


